Friday, June 3, 2022

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही असणार IMP'

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही असणार IMP'


    CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.


    महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र  CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

    पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना आलेले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

    तसंच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि CET चे 50 टक्के अशा एकूण मार्कांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं नक्कीच वाढणार आहे असं उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

    ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटी द्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू असणार आहे.

हे पण वाचा, PAN - Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली



या असतील परीक्षेच्या तारखा :

        MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...